मराठी बोधकथा - सासू..!

 मी दहावीला असतांना आईला मी एकदा म्हणाले, काय ग! तुम्हां सुनांना सासु नकोशी का वाटते? सासु एका सुनेला नकोशी वाटेल परंतु जगामधल्या सर्वाच सुनांना सासु ही जवळ जवळ नकोशी का वाटते? तेव्हा आई चटकन म्हणाली, अग! सासु या शब्दाची फोड करुन पहा. सासु म्हणजे सारख्या सुचना . जी सारख्या सुचना देत राहते ती सासु. आता सुचना ऎकायला कुणाला आवडेल?

      माझ्या डोक्यात चटकन प्रकाश पडला की,  हे खरे आहे . सासु तिचे वय अधिक तिने अधिक जग पाहिलेले आणि तिला असे वाटतं माझ्याजवळ अनुभवाचं गाठोड आहे. हे भांडार मी सुनेला दिले पाहिजे . तर सुनेला त्याच वेळेला वाटत की मी तरुण आहे. माझ्या अंगी उत्साह आहे . काही तरी करण्याची उमेद आहे . मला स्वतंत्रपणे काम करु द्या. मला सारख्या सुचना देउ नका आणि या दोन प्रव्रुत्ती मधुन जो दंव्द निर्माण होते त्या द्व्दातुन सासू सुनेच वैर  आपल्याला पाहायला मिळतं .
  
      जगामध्ये कुणालाही सुचना दिलेल्या आवडत नाही. कारण सुचना स्विकारल्यामुळे कुठेतरी व्यक्तीचा अहंकार दुखावल्या जाउ शकतो. सुचना देणारा व्यक्ती ही आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आपण कनिष्ठ आहोत . त्याला आपल्यापेक्षा जास्त कळते. त्याने दिलेल्या सुचना पाळायला पाहिजे? अशी भावना सुचना स्विकारणार्‍याच्या मनात निर्माण होते. सुन जेव्हा घरामध्ये नविन असते तेव्हा सासू तिला कुटुंबाचे रिती  रिवाज, विधी, चालीरिती या गोष्टी समजावून सांगते आणि ती नविन असल्यामुळे मुकाटपणे ती सर्व ऎकुण घेते . ह्या सुचना ग्रहण करते. परंतु  जशी- जशी सुन जुनी होत जाते तशी तशी तिची ऎकण्याची प्रव्रुत्ती, सुचना स्विकारण्याची प्रव्रुत्ती कमी होत जाते. तिला तिच्या निर्णय प्रक्रियेचा घाला वाटतो . तिचा अहंकार दुखावल्या जातो.

सासू सुनेचे नाते टिकुन ठेवायचे असेल, तर जगातील सर्व सासवांनी आपल्या सुनांना सुचना देण्याचे कटाक्षाने टाळले पाहिजे. जर सुचना देण्याचे प्रमाण कमी झाले तर सासु सुनांच्या नात्यामध्ये नक्कीच गोडवा निर्माण होउ शकेल.

तसेही जेव्हा वय वाढत जाते तेव्हा बोलण्याच प्रमाण कमी झालं पाहिजे. परंतू जगामध्ये मात्र आपल्याला उलट पाहायला मिळते जसं जसं वय वाढत तसतशी माणसं अधिकाधिक सुचना द्यायला लागतात. परंतु जर नाती टिकवायची असतील, तर मात्र सुचणांचे प्रमाण कमी असले पाहिजे . असेच आपल्या या सासु या शब्दातून दिसुन येते.

शब्द किती अर्थपुर्ण असतात त्या त्या शब्दामध्येच त्या शब्दांची व्याख्या देखील लपलेली असते. सासू सारख्या सुचना आणि सुन म्हणजे सुचना नको असलेली आता जिला सुचना नको आहेत तिला सारख्या सुचना देवुन काय उपयोग! हे जर सासवांनी जाणून घेतलं तरच सासु सुनेच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण हो शकेल.